काँग्रेस पाठोपाठ पवारांचीही ठाकरेंवर नाराजी; पण तरीही ठाकरेंची काँग्रेस + राष्ट्रवादीवर कुरघोडी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांच्या उमेदवारी यादीची वाट पाहण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची उमेदवारी यादी जाहीर करून टाकली. त्यात त्यांनी काँग्रेस कडून 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून 1 अशा 4 जागा खेचून घेतल्या. त्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर केले. Uddhav thackeray announced his shivsena candidates, Congress + NCP leaders got angry, but shivsena remained adamant

त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ठाकरेंवर नाराज झाले. त्यांनी आपापल्या पक्षाच्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. यात शरद पवारांचा देखील समावेश होता, पण उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र आपल्या उमेदवार यादीवर ठाम आहे. यावर संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केले. काँग्रेसच्या सूचनेनुसार हॉटेल ट्रायडेंट मध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे वरिष्ठ नेते भेटतील, पण त्यावेळी जागा वाटपावर कुठलीही चर्चा होणार नाही. उद्धव ठाकरेंनी जी यादी जाहीर केली ती अंतिम आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार आणि काँग्रेस नेत्यांनी जरी उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली तरी ठाकरेंनी काँग्रेस + राष्ट्रवादीवर केलेली कुरघोडी कायम राहिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या बैठकीत नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ईशान्य मुंबईतील जागेवरून राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील यांनी २००९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ही जागा जिंकली होती. मात्र त्यानंतर सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच त्यांनी निवडणूक लढवली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा जिंकून येण्याची शक्यता असताना संजय दिना पाटलांची उमेदवारी ठाकरेंनी शिवसेनेतर्फे जाहीर केली.


काँग्रेसच्या 8व्या यादीत 4 राज्यांमधून 14 नावे; गुनामध्ये ज्योतिरादित्य यांच्यासमोर राव यादवेंद्र


गेल्या 3 निवडणुकींवर नजर टाकली तर 2009 मध्ये संजय पाटील यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावले आणि अवघ्या 3000 मतांनी विजय मिळवला. त्यानंतर मात्र, नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात या ठिकाणी 2014 मध्ये किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये मनोज कोटक यांनी अनुक्रमे तब्बल 60 % आणि 56 % टक्के मते मिळवत दणदणीत विजय मिळवले. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि हाती शिवबंधन बांधले.

मात्र, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मित्रपक्षाकडे जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुंबईतील कार्यकर्ते आग्रही होते. मुंबईतील इतर कोणत्याही जागी आमचा दावा नाही, मात्र या जागी आमचा उमेदवार निवडून येण्याची पूर्ण शक्यता असूनही त्यावर संजय दिना पाटील यांचेच नाव शिवसेनेतर्फे घोषित होणे दुर्दैवी आहे, असे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पाटील यांना कधीही सव्वादोन लाखांपेक्षा अधिक मते या मतदारसंघातून मिळालेली नाहीत, याहीवेळी त्यांना चौथ्या वेळेस उमेदवारी दिली तर एक महत्त्वपूर्ण जागा हातची जाऊ शकते, अशी शक्यताही नेत्याने वर्तवली.

दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा बुधवारी सकाळी झाल्यानंतर त्याच वेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात संसदीय कार्यकारिणी समितीची बैठक सुरू होती. यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या निर्णयाचा निषेध केला. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी ईशान्य मुंबई आपल्याकडे घेऊन त्यावर उमेदवार देण्याची आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींपुढे केल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Uddhav thackeray announced his shivsena candidates, Congress + NCP leaders got angry, but shivsena remained adamant

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात