जात प्रमाणपत्र रद्द होताच काँग्रेसवर रामटेकचा उमेदवार बदलण्याची वेळ; रश्मी बर्वे यांच्याऐवजी पती श्यामकुमार बर्वे यांना तिकीट!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाची थोडीशी घाई झाली आणि रामटेक मध्ये पक्षाने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केले, पण जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यामुळे त्यांची उमेदवारी आता अडचणीत सापडली असून काँग्रेसला त्यांच्या ऐवजी त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली आहे. Ticket to husband Shyam Kumar Barve instead of Rashmi Barve

रश्मी बर्वे यांच्या विरोधात एकाने जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अर्ज दाखल केला होता त्याचा निर्णय प्रलंबित होता, पण काँग्रेसने आपली विदर्भातल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांचे नाव रामटेकच्या उमेदवार म्हणून जाहीर केले, पण जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. रश्मी बर्वे त्या विरोधात हायकोर्टात गेल्या आहेत.

पण दरम्यानच्या काळात काँग्रेसने त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांचा डमी अर्ज पक्षाच्याच वतीने दाखल केला होता. त्यामुळे आता तेच काँग्रेसचे रामटेक मधले उमेदवार असण्याची शक्यता आहे. रश्मी बर्वे यांचा अर्ज फेटाळला बरोबर श्याम कुमार बर्वे यांचा अर्ज वैध ठरू शकतो.

Ticket to husband Shyam Kumar Barve instead of Rashmi Barve

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात