Loksabha Election : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांना दिली उमेदवारी


सातव्या यादीत केवळ दोन जागांचाच समावेश, जाणून घ्या दुसरी जागा कुठली?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्या सध्या या जागेवरून खासदार आहेत. त्याचवेळी कर्नाटकातील चित्रदुर्ग मतदारसंघातून भाजपने गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने ज्या दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत त्या राखीव जागा आहेत.BJP’s seventh list announced Navneet Rana was nominated from Amravati



2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार अपक्ष विजयी होऊन संसदेत पोहोचले होते. नवनीत राणा या त्यापैकीच एक होत्या. अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांनी 36,951 मतांनी विजय मिळवला होता.

गोविंद करजोल हे पाच वेळा आमदार झाले आहेत

गोविंद मुक्तप्पा करजोल हे ऑगस्ट 2021 ते मे 2023 पर्यंत कर्नाटक सरकारमध्ये मुख्य आणि मध्यम पाटबंधारे, जलसंपदा मंत्री राहिले आहेत. ते पाच वेळा मुधोळ विधानसभेचे आमदार राहिले आहेत. तसेच करजोल 2018 ते 2019 या काळात कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते होते. याशिवाय ते भाजपचे कर्नाटक प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत.

BJP’s seventh list announced Navneet Rana was nominated from Amravati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात