नाशिक : महाराष्ट्रात काका – पुतण्याचे पक्ष वेगळे झाले. दोघांनाही वेगवेगळी चिन्हे मिळाली, पण या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या ब्रँडचा विस्तार होण्याऐवजी त्याचे आकुंचनच झाले. हे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात राष्ट्रवादी ब्रँडच्या वाट्याला आलेल्या जागांच्या संख्येने स्पष्ट झाले. NCP’s political brand shrinks in 2024 than 2019
कोणताही मोठा उद्योग समूह विभागला, तर ते दोन स्वतंत्र विभाग वेगवेगळ्या मार्गाने विस्तारत राहतात आणि उद्योग समूहाचे नाव एकच असेल तर तो ब्रँड त्या प्रमाणात विस्तारतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षाच्या बाबतीत हे निदान 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरी घडलेले दिसत नाही. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा ब्रँड आकुंचन पावल्याचे स्पष्ट दिसत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये जे जागावाटप झाले, त्यामध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 26 जागा काँग्रेसने आणि 22 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवायचे निश्चित झाले होते. त्यापैकी राष्ट्रवादीने हातकणंगलेची 1 जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि दुसरी अमरावतीची जागा रवी राणांच्या पक्षाला सोडली होती. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ चिन्हावर 20 जागांवर उमेदवार उभे केले होते.
पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या आघाड्या वेगवेगळ्या आहेत, पण त्यातूनच आपल्या पक्षांचा विस्तार होण्याऐवजी काका – पुतण्याच्या पक्षांचे आकुंचन झाले आहे. काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाला महाविकास आघाडीतल्या फक्त जागा 10 जागा वाट्याला आल्या असून महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त 7 जागा आल्याचे बोलले जात आहे. याचा अर्थ काका आणि पुतण्याचे दोन पक्ष मिळून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या ब्रँड वर वेगवेगळ्या चिन्हांवर फक्त 17 जागा लढवणार आहेत. हेच ते राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या ब्रँडचे राजकीय आकुंचन आहे. यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 जागांचे नुकसान आहे
पवार काका – पुतण्याचा पक्ष फुटून त्याचा विस्तार होण्याऐवजी त्याचे आकुंचन होणे हे खुद्द पवार नावाच्या ब्रँडचे त्याहीपेक्षा जास्त मोठे आकुंचन आहे. शरद पवारांचा पक्ष त्यांच्या नावावर मते मागणार आणि अजित पवारांचा पक्ष त्यांच्या नावावर मते मागणार पण एकूण पवार नावाचा ब्रँड महाराष्ट्रात फक्त 1/3 जागाच लढवणार हे स्पष्ट आहे आणि मग त्यातून निवडून तरी किती येणार?? हा खरा सवाल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App