विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व आणि दक्षिण भारतामधल्या राज्यांमधून खासदार संख्या वाढवण्याची भाजपला खात्री आहे. त्यावर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी टाइम्स नऊच्या मुलाखतीत शिक्कामोर्तब देखील केले. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापर्यंत भाजपने पूर्व आणि दक्षिण भारतामधल्या राज्यांमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे. त्या उलट महाराष्ट्रात पवार + ठाकरे आणि काँग्रेस फक्त महाराष्ट्रातल्याच 48 जागांमध्ये खेचाखेची करताना दिसत आहेत.BJP trying to increase its tally in east and south India, but pawar + thackeray scrambled in maharashtra politics
2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपणच सेट केलेले 370 जागांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपचे नेते आटापिटा करत आहेत, त्यात ते किती यशस्वी होतील हे आज तरी आकड्यानिशी सांगता येणार नाही. पण हे निश्चित सांगता येईल की, भाजप पूर्व आणि दक्षिण भारतातल्या राज्यांमधून आपली खासदार संख्या वाढवेल. पूर्वेकडच्या आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा दक्षिणेतल्या आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पूर्वी भाजपची ताकद कमी होती, पण गेल्या पाच वर्षांमध्ये जमिनी स्तरावर काम करून भाजपने आपली ताकद वाढवली आहे आणि सध्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक प्रत्येक जण गांभीर्याने निवडणुकीच्या कामाला लागला आहे. त्याचा परिणाम म्हणूनच भाजपची खासदार संख्या या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर वाढेल. भाजपचे या राज्यांमध्ये मिळून 57 खासदार आहेत ती संख्या लक्षणीयता वाढलेली दिसेल, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.
त्या उलट महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिमा “राष्ट्रीय” नेत्याची असली तरी, ते फक्त राज्यातच अडकून पडले आहेत. त्यातही फक्त बारामती मतदारसंघावर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केले आहे. कारण तिथे त्यांना त्यांचाच पुतण्या अजित पवार यांनी आव्हान दिले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुतीला तोंडी आव्हान देत असली तरी प्रत्यक्षात जागा वाटपाच्या खडकावर आघाडी फुटू शकते. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान पेलताना देखील महाविकास आघाडीला घाम फुटू शकतो, असेच महाराष्ट्रातले चित्र आहे.
त्यामुळे भाजप सरकार राष्ट्रीय पक्ष एकीकडे पूर्वेकडच्या आणि दक्षिणेतल्या राज्यातून आपली खासदार संख्या वाढवण्याची खात्री बाळगत असताना दुसरीकडे पवारांसारखा “राष्ट्रीय” नेता आणि उद्धव ठाकरे यांचा प्रादेशिक नेता महाराष्ट्रातल्याच 48 जागांच्या लढाईत अडकून पडला आहे, हेच चित्र सध्यातरी लोकसभेच्या लढाईचे दिसते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App