वृत्तसंस्था
इस्लामाबाद : 25 आणि 26 मार्चच्या मध्यरात्री बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला. तर सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे सापडली आहेत.Terrorist Attack on Pakistan Naval Base; 4 terrorists killed, one jawan martyred; Baloch Liberation Army took responsibility
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तानमधील चीनच्या गुंतवणुकीच्या विरोधात बलुचिस्तानच्या तुर्बत शहरात असलेल्या नौदल तळावर त्यांचे सैनिक घुसल्याचा दावा बीएलएने केला आहे. येथे चिनी ड्रोन तैनात करण्यात आले होते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ऑपरेशनदरम्यान एका जवानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आमच्या जवानांनी देशाला मोठ्या नुकसानीपासून वाचवले आहे.
बीएलएचा सात दिवसांत दुसरा हल्ला
बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने नौदल तळावर केलेला हल्ला हा या आठवड्यातील दुसरा हल्ला आहे. याआधी 20 मार्च रोजी या संघटनेने ग्वादरमधील मिलिटरी इंटेलिजन्सच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तर सुरक्षा दलांनी 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
ग्वादरमधील बीएलएच्या हल्ल्याचे चीनशीही संबंध आहेत. वास्तविक, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत ग्वादर बंदराचे बहुतांश व्यवस्थापन चिनी कंपन्यांकडे आहे.
डेरा इस्माईल खानमध्ये 4 दहशतवादी मारले गेले
जिओ न्यूजनुसार, पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी 25 मार्च रोजी डेरा इस्माईल खानमध्ये विशेष ऑपरेशनही केले होते. यामध्ये 4 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानी लष्कराच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी देशातील अनेक हल्ल्यांना जबाबदार होते. त्यांच्या हल्ल्यात अनेक सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक मारले गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App