गुरुवरच्या आरोपांची शिष्यावर पुनरावृत्ती; प्रकाश आंबेडकरांच्या पाठीत राऊतांची खंजीर खुपशी!!

Prakash ambedkar targets Sanjay Raut for back stabbing

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुरुवरच्या आरोपांची शिष्यावर पुनरावृत्ती; प्रकाश आंबेडकरांच्या पाठीत राऊतांची खंजीर खुपशी!!, असे आज मुंबईत घडले उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली. त्यावर काँग्रेस आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली, पण त्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसला असे चित्र शेअर करून मोठा राजकीय बॉम्बस्फोट घडविला. Prakash ambedkar targets Sanjay Raut for back stabbing

पाठीत खंजीर खुपसणे हा शब्दप्रयोग 1978 मध्ये महाराष्ट्रात चर्चेला आला. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले ही त्यावेळची घटना होती. त्यावरच आधारित “पाठीत खंजीर खुपसणे” हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात रूढ झाला. त्या घटनेची आठवण करून देणारे चित्र प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे फक्त यामध्ये खंजीर धरलेला हात संजय राऊत यांचा आहे आणि पाठ वंचित बहुजन आघाडीची आहे.

संजय राऊत किती खोटे बोलतात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची मते एकच आहेत त्या दोघांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करायचा आहे, असे संजय राऊत म्हणतात. पण 6 मार्चला हॉटेल सीजन मध्ये झालेल्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला त्यांनी कुठल्याच बैठकांना बोलावलेच नाही. हे पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम आहे.

“सिल्वर ओक” मध्ये झालेल्या बैठकीत संजय राऊत यांनी कोणती भूमिका घेतली होती?? त्यांनी अकोल्यात माझ्याविरुद्ध उमेदवार उभा करण्याची भूमिका मांडली होती. एकीकडे ते महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी झाल्याचे भासवतात आणि दुसरीकडे अकोल्यातून माझा पराभव करण्याचा षडयंत्र रचतात, असा खळबळ जनक आरोप करणारे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आणि त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी प्रचंड राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

Prakash ambedkar targets Sanjay Raut for back stabbing

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात