संजय राऊतांच्या अडचणीत वाढ : पत्राचाळ घोटाळ्यात राऊतांची पडद्याआडून भूमिका, EDचा युक्तिवाद, सोमवारी रिमांड


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचे ईडीने या आरोपपत्रात नमूद केले. राऊत हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यामुळे तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवादही ईडीने यापूर्वी केला होता.Sanjay Raut’s trouble increases Raut’s behind-the-scenes role in mail scam, ED’s argument, remand on Monday

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या ते ऑर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्या. एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता सोमवारी राऊतांची पुढची रिमांड व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होईल.द्वेषातून कारवाई नव्हे

संजय राऊत यांच्यावर राजकीय सूडबुद्धी किंवा द्वेषातून कारवाई केली नाही, असे ईडीने कोर्टासमोर स्पष्ट केले. राऊत यांच्याविरुद्ध प्रथम दोषारोपपत्र १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. संजय राऊतांनी प्रवीण राऊतसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केले आहे. राऊत हे राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असे सांगत ईडीने जामिनाला विरोध केला.

Sanjay Raut’s trouble increases Raut’s behind-the-scenes role in mail scam, ED’s argument, remand on Monday

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात