चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न


वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात शनिवारी मध्यरात्री खूप गोंधळ झाला. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सुमारे 60 इतर विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले. हे व्हिडिओ तिने शिमल्यात राहणाऱ्या आपल्या मित्राला पाठवले. त्याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस येताच 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Shocking incident in Chandigarh University Video of 60 female students taking bath goes viral; 8 people attempted suicide

रात्री अडीचच्या सुमारास ही घटना समजताच पोलीस तेथे पोहोचले. मात्र, संतप्त झालेल्या विद्यार्थिनी पोलिसांवरही भडकल्या. त्यांनी पोलिसांना विरोध करत त्यांच्या वाहनांची तोडफोडही केली. व्हिडिओ पुढे पाठवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या कॅम्पसमधील वातावरण तणावपूर्ण आहे.



व्हिडिओ बनवण्यामागचे उद्देश जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेतया प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सातत्याने विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू काय आहे. विद्यार्थिनी अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ बनवत होती. हे व्हिडिओ गोळा करण्याचा उद्देश काय होता? या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिमल्यात राहणाऱ्या आरोपी मित्राला पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही मुलगी आणि मित्र दोघेही हिमाचलचे आहेत. या दोघांनी असे का केले? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका मुलीची प्रकृती चिंताजनक, कुटुंबीयांना बोलवावे

ज्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले. त्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.यानंतर त्या सर्व 8 विद्यार्थिनींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी तेथे बोलावले आहे.

खूप दिवसांपासून व्हिडिओ बनवत होती

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही तरुणी बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. हे व्हिडिओ शिमल्यातील तिच्या मित्राला पाठवत होती. त्या मित्राने आता हे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. हे समजताच मुलींचा राग अनावर झाला.

विद्यापीठ व्यवस्थापनावर प्रकरण दडपल्याचा आरोप

विद्यापीठ व्यवस्थापनावर कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपल्याचा आरोपही मुलींनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरूच होता. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुलींशी संबंधित प्रकरण असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथे कॅम्प लावला आहे.

Shocking incident in Chandigarh University Video of 60 female students taking bath goes viral; 8 people attempted suicide

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात