मोदींचा वाढदिवस… गमावलेले परत… ते देशाच्या खर्चाची बचत!… कसे ते वाचा!


विशेष प्रतिनिधी 

“मोदींचा वाढदिवस… गमावलेले परत… ते देशाच्या खर्चाची बचत…!!”, हे शीर्षक सुरुवातीला जरा वेगळे वाटेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या 72 व्या वाढदिवसाची 17 सप्टेंबर 2022 ची खासियत आहे!! PM Narendra Modi 72 birthday : lost treasure jungle cheetah brought back to India women, students interaction and new national logistics policy announced

8 चित्ते भारतात

मोदींच्या वाढदिवसाची सुरुवातच मुळी, भारताने गेल्या 70 वर्षांपूर्वी जे गमावले होते, ते परत मिळवल्याची सुरुवात होती. जंगलातल्या इकोसिस्टीम मधल्या महत्त्वाचा घटक चित्ता भारतातून नामशेष झाला होता, तो चित्ता नामिबियातून परत आणून त्याला भारतातील अभयारण्यात सुरक्षित अधिवास निर्माण करून देणे, हे आज घडले आहे!! नामिबियातून आणलेले 8 चित्ते पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मध्यप्रदेश मधल्या कुनो राष्ट्रीय अभयारण्य मुक्त अधिवासात सोडले आहेत. या चित्त्यांची भारतात वाढ होऊन गवताळ प्रदेशाची पुन्हा निर्मिती होण्यापर्यंतचा प्रवास आणि या निमित्ताने जंगल अधिवासातील नागरिकांच्या जीवनात सुधारणा याची अपेक्षा मोदींनी व्यक्त केली आहे.

अतिशिकार आणि दुर्लक्ष यामुळे, किंबहुना मानवी हस्तक्षेपामुळे चित्ता भारतातून नामशेष झाला होता. परंतु, सरकारी पातळीवर यशस्वी प्रयत्न करून नामिबिया या देशातून 8 चित्ते भारतात आणले आहेत. त्यांची शास्त्रीय दृष्ट्या मुक्त अधिवासात देखभाल देखील केली जाणार आहे. यासाठी मध्य प्रदेश सरकारने वन तज्ज्ञांशी बोलून योग्य तो अधिवास मिळवून देण्याचे प्रयत्न तर केले आहेतच, पण चंबळ परिसरातील या कोण्या अभयारण्याच्या आसपासच्या नागरिकांचे चित्त्यांविषयी प्रबोधन करण्यासाठी 450 “चीता मित्र” ही तयार केले आहेत. हे चित्ता मित्र पुढची काही वर्षे या प्रदेशात तसेच भारतभरात चित्त्यांविषयी जनजागृती करणार आहेत. या चित्ता मित्रांच्या प्रतिनिधींशी आज पंतप्रधान मोदींनी कुनो राष्ट्रीय अभयारण्यात संवाद साधला आहे.

चित्ता मित्रांशी संवाद

किंबहुना अशा स्वरूपाने प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्याची मोदींची शैली ही त्यांनी कुनो राष्ट्रीय अभयारण्यात देखील पाळली आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर तयार करण्याचे काम करणाऱ्या इंजिनियर्स आणि कामगारांशी त्यांनी यापूर्वीच संवाद साधून त्यांच्यावर अक्षरशः फुले उधळली होती. नवीन संसद भवन आणि सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती केलेल्या कामगारांशी देखील मोदींनी आवर्जून संवाद साधला होता. तसाच संवाद त्यांनी कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ता मित्रांशी साधला आहे.

महिला, विद्यार्थ्यांशी संवाद

त्यानंतर मोदींनी मध्य प्रदेशातील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्या पाठोपाठ पंतप्रधान मोदींनी देशभरात विविध शहरांमध्ये जमलेल्या 9 लाख आयटीआय विद्यार्थ्यांशी स्किल डेव्हलपमेंट या विषयावर संवाद साधला आहे. कौशल्य निर्माण, कौशल्य परिशिलन आणि कौशल्य पुनर्शिक्षण यावर भर देण्यासाठी मोदींनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.

 नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी

त्या पाठोपाठ आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भावनातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय रसद नीती म्हणजे “नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी जाहीर केली आहे. या रसद नीतीचे महत्त्व असे, की भविष्यात कोणत्याही उत्पादनाची गुंतवणूक, निर्मिती, वाहतूक आणि प्रत्यक्ष उत्पादन ते ग्राहक याचा जो खर्च आहे, तो कमी करण्याच्या दृष्टीने नव्या रसद नीतीचे निर्धारण करण्यात आले आहे. भारतात लॉजिस्टिक्स अर्थात रसद आणि पुरवठा यावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्थात जीडीपीच्या 13 % खर्च होतो. परंतु, विकसित देशांमध्ये लॉजिस्टिक्स वरचा खर्च त्यांच्या जीडीपीच्या 9 % आहे. याचा अर्थ भारतासारख्या वेगाने विकसित होऊ घातलेल्या अर्थव्यवस्थेत लॉजिस्टिकचा खर्च विकसित देशांपेक्षा 4 % नी अधिक आहे, की जो वाचवला, तर रकमेच्या दृष्टीने तो काही लाख कोटींमध्ये जातो आणि त्याची बचत केली, तर त्याचा लाभ प्रत्यक्ष उत्पादनात, निर्मितीत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचून त्याच्या स्वस्ताई मध्ये भर पडणार आहे. या दृष्टीने लॉजिस्टिक्सवरचा खर्च कमी करण्यावर भर देणारी राष्ट्रीय रसद नीती अर्थात राष्ट्रीय पुरवठा धोरण पंतप्रधान मोदींनी जाहीर केले आहे.

याचा अर्थच मोदींच्या आजच्या 72 व्या वाढदिवशी 17 सप्टेंबर 2022 रोजी दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी ज्या कार्यक्रमांना उपस्थित होते, त्याचा मोटो… भारताने पूर्वी जे गमावले होते, ते परत आणले आणि वाढदिवशी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाची अखेर संपूर्ण देशाच्या खर्चाची बचत याचे धोरण जाहीर करण्यात झाली आहे!!

PM Narendra Modi 72 birthday : lost treasure jungle cheetah brought back to India women, students interaction and new national logistics policy announced

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात