वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यातील 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतीची निवडणूक आज होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहे. याबरोबरच थेट सरपंचपदासाठीही आज मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे.Gram Panchayat Elections Voting for 608 Gram Panchayats in 51 Talukas of 16 Districts Begins; The reputation of the leaders is at stake
अनेक उमेदवार रिंगणात
नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होत आहे. नंदूरबारमध्ये 139 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया आज होत आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानाला सुरुवात
धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान सुरू झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 05 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 45 मतदान होणार आहे. अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.
जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या
नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75. धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02. अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01. वाशीम: कारंजा- 04. अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01. यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01. हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04. नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17. पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02. अहमदनगर: अकोले- 45. लातूर: अहमदपूर- 01. सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08. कोल्हापूर: कागल- 01.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App