पवार भक्तांना वाटतं सगळं जग साहेबच चालवतात; अजितदादांच्या उपस्थितीत फडणवीसांची फटकेबाजी!!

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याच्या आणि नसल्याच्या पार्श्वभूमीवर पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी सत्तेत राष्ट्रवादी आणि विरोधातही राष्ट्रवादी ही शरद पवारांची खेळी असल्याचा संभ्रम पसरवला आहे. पवारनिष्ठ नेते आणि कार्यकर्ते तीच चर्चा घडवत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर जोरदार टोला हाणला आहे. पवार भक्तांना असे वाटते की सगळे जग साहेबच चालवतात. पण अशी वस्तुस्थिती नसते, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवार आणि पवारांच्या भक्तांचे वाभाडे काढले आहेत.Pawar devotees think that the whole world is run by Saheb; Flogging of Fadnavis in the presence of Ajit Dad!!



राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीच नाही, असा दावा शरद पवारांसह काही नेत्यांनी केला, तर अजित पवार गट प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावला जात आहे. यामुळे राजकीय नेत्यांसह जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण सत्तेत आणि विरोधीपक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने ही सर्व शरद पवारांचीच खेळी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढारीच्या मुलाखतीत पवारनिष्ठांना टोला हाणला आहे.

फडणवीस म्हणाले, की शरद पवारांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होत असतात. त्यामुळे संपूर्ण जग शरद पवारच चालवतात, अशाप्रकारे बोललं जातं. पण तसे वस्तुस्थिती नसते.

काही भक्त असेही आहेत की, जगात जे काही चालतं ते शरद पवारच चालवतात, असं त्यांना वाटतं. मला शरद पवारांबद्दल आदर आहे. पण काही भक्तांना असं वाटतं. त्यामुळे हे जग आमचे पवारसाहेबच चालवतात, अशाप्रकारे बोललं जातं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता आम्ही तिघे एकत्रित आहोत. अतिशय भक्कपणे एकत्र आहोत. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू. पुन्हा आम्ही निवडून येऊ… चांगल्या प्रकारे आम्ही निवडून येऊ. आमच्या जागा आणखी वाढतील. जागा कमी होणार नाहीत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यामुळे आवश्यकता असेल तर अजित पवार त्यांचा सल्ला घेतात. कधी आम्हालाही शरद पवार सल्ला देत असतात.

Pawar devotees think that the whole world is run by Saheb; Flogging of Fadnavis in the presence of Ajit Dad!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात