मराठा समाज मागास नाही, आरक्षण म्हणजे खिरापत नाही; लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना सुनावले!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाज मागास नाही आणि आरक्षण म्हणजे खिरापत नाही, अशा शब्दांमध्ये ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना सुनावले.Maratha society is not backward, reservation does not mean decay; Manoj Jarang heard Laxman calls!!

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध करण्यासाठी ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरला. प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात दहा दिवस आमरण उपोषण केले. पण ओबीसीचे उपोषण हे राजकीय षडयंत्र आहे, भुजबळांच्या निशाण्यावर ओबीसींचे आंदोलन सुरु आहे असा आरोप मनोज जरांगेंनी काल केला होता. याच मुद्द्यावर लक्ष्मण हाकेंनी थेट जरांगेंना प्रत्युत्तर दिले.



लक्ष्मण हाके म्हणाले :

– संविधानांच्या तरतुदीत मराठा समाज सामाजिक मागासलेपण सिद्ध करु शकला नाही. कोर्टाने सुद्धा ही बाब सांगितले 600 पानांचे जजमेंट दिले, याबाबीवर कोणीही बोलायला तयार नाही. एखादा आंदोलन करतो, झुंडशाहीच्या जोरावर सगळ्यांना वेठीस धरतो, भुजबळांना संपवतो, विधानसभेला 288 जागांवर लढवीन असे इशारा देतो, सरकारला वेठीस धरतो, अशी दादागिरी चालणार नाही. सरकारचा मला राग येतो की ते मनोरंजन करतात. त्यांनी फक्टॅस दाखवाव्यात.

– मराठा समाज मागसलेला नाही आणि आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असे म्हणत हाकेंनी थेट जरांगेंना टोला लगावला. आरक्षण का दिले जाते? कोणाला दिले जाते? याचा जरांगेंनी अभ्यास करावा. तुमचेच मुख्यमंत्री आणि तुमचेच आमदार – खासदार आहेत. कित्येक वर्ष सत्तेवर आहेत, विधानसभेत, लोकसभेत मराठा समाजाचे प्रतिनिधित्व जास्त आहे. तुलनेत इतर समाजाचे प्रतिनिधित्व कमी आहे, असा आकडाच हाकेंनी वाचून दाखवला.

– जरांगेंचे बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत. भुजबळांच्या सांगण्यावरून मी काम करतोय, माझा धनगरांशी काही संबध नाही असे त्यांनी काही बोलू नये. मनोज जरांगेंना आरक्षण कळतंय का??

– सरकारने केलेले सर्वेक्षण बोगस आहे. अनेक ठिकाणी जुन्या कागदांवर खाडाखोड करून पेन ने लिहून अनेकांना कुणबी करून त्यांना सर्टिफिकेट दिली. ही सगळी सर्टिफिकेट खोटी आहेत.

Maratha society is not backward, reservation does not mean decay; Manoj Jarang heard Laxman calls!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात