T20 World Cup 2024 मध्ये भारताची विजयी घौडदोड कायम आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: T20 World Cup 2024 मध्ये भारताची विजयी घौडदोड कायम आहे. सुपर-8 मधील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकतर्फी 50 धावांनी सामना जिंकला. यापूर्वी टीम इंडियाने सुपर-8 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला होता. बांगलादेशविरुद्धच्या विजयासह टीम इंडियाही विशेष यादीत सामील झाली आहे. या विजयासह भारतीय संघाने विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. Team India created history by defeating Bangladesh
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 49 सामने खेळले आहेत. त्यापैकी 33 सामने जिंकले आहेत. तर 15 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने टी-20 विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या श्रीलंकन संघाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. श्रीलंकेनेही टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून हा विक्रम मोडण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल.
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 196 धावा केल्या. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने 27 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 37, ऋषभ पंतने 36 आणि शिवम दुबेने 34 धावांचे योगदान दिले. तर बांगलादेशकडून तनझिम हसन साकिब आणि रिशाद हुसैन यांनी 2-2 बळी घेतले.
197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ केवळ 146 धावा करू शकला. नजमुल हुसेन शांतोने संघाकडून सर्वाधिक 40 धावांची खेळी खेळली. तर रिशाद हुसेनने 24 धावांचे योगदान दिले. तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने 2-2 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला यश मिळाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App