विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल मधून काँग्रेस पक्ष संपवून आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियांका गांधींचा प्रचार करायला तयार झाल्या आहेत. पण त्यासाठी काँग्रेसला बंगालमध्ये स्वतःच्या पक्षातला एक “राजकीय बळी” द्यावा लागला आहे After destroying Congress in west bengal mamata banerji ready to campaign for priyanka gandhi in waynad
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 आकडा गाठल्यानंतर विरोधक लोकसभेत मजबूत झाले. ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसने देखील बंगालमधून 29 खासदार लोकसभेत पाठवले. मात्र त्याचवेळी ममतांनी बंगालमध्ये काँग्रेसला ठेंगा दाखविला. त्यांनी काँग्रेसला 42 पैकी फक्त 2 जागा देऊ केल्या होत्या. त्यामुळे बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेस परस्परांविरुद्ध लढले. मात्र, त्याचा परिणाम ममतांच्या यशावर झाला नाही. ममतांचे 29 खासदार लोकसभेत पोहोचलेच.
पण ममता बॅनर्जींचे बंगालच्या राजकारणातले कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी त्यांच्या बेहरमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरले. ममतांच्या पक्षातून क्रिकेटर युसुफ पठाण याने निवडणूक लढवून अधीर रंजन चौधरींना पराभूत केले. त्यामुळे ममता बॅनर्जी “खुश” झाल्या. अधीर रंजन चौधरींना पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ममतांच्या राजकीय खुशीत भर पडली. आता ती “खुशी” जाहीर करण्यासाठी ममता बॅनर्जी केरळच्या वायना लोकसभा मतदारसंघात प्रियांका गांधींचा प्रचार करायला तयार झाल्या.
राहुल गांधींनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघांमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे राखून ठेवला आणि त्याच वेळी प्रियांका गांधींची वायनाड मधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे वायनाड हा लोकसभा मतदारसंघ हाय प्रोफाईलच राहिला. तिथे आता ममता बॅनर्जी प्रियांका गांधींसाठी प्रचार करून गांधी परिवाराशी आपले “पॉलिटिकल इक्वेशन” सुधारण्याच्या बेतात आहेत, पण त्यासाठी काँग्रेसला बंगालमध्ये मात्र अधीर रंजन चौधरी या नेत्याच्या रूपाने स्वतःच्या पक्षातला “राजकीय बळी” द्यावा लागला आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App