मुस्लिमांना पण OBC मधूनच आरक्षण द्या; छाताडावर बसून आरक्षण घेण्याची मनोज जरांगेंची भाषा!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार OBC आरक्षणाला धक्का लावणार नाही, हे लक्षात आल्यानंतर संतापलेल्या मनोज जरांगे पाटलांनी दादागिरीची भाषा करत मुस्लिमांनाही OBC प्रवर्गातूनच आरक्षण द्या. तुम्ही आरक्षण कसे देत नाही ते बघतो. छाताडावर बसून आरक्षण घेतो, अशी दमदाटी केली.reservation to Muslims even from OBC; Manoj Jarang’s language of taking reservation sitting on an umbrella!!

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहेच, पण OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन शिंदे – फडणवीस सरकारने ओबीसी उपोषण करते मनोज हाके यांना दिले. त्यामुळे मनोज जरांगे संतापले आणि त्या संतापातूनच त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेण्याची दमदाटीची भाषा वापरली.



मनोज जरांगे म्हणाले :

राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.

माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर आम्हीदेखील तुम्हाला आमचे व्यवसाय दाखवतो. ते बागायती शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. आम्हीदेखील शेतकरी मराठा म्हणून आमचा व्यवसाय दाखवतो. आम्हाला उत्तरं द्या. असं गोड बोलू नका. तुम्ही त्यांचे लाड खूप पुरवले. आमचा त्यांना विरोध नाही. तुम्हाला सर्वकाही संविधानानं हवं आहे ना, मग आम्हाला उत्तरं द्या तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण कसे दिले??

मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या

– काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी सरकारी नोंदी निघाल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. सरकारदरबारी हे कुणबी शेतकरी असल्याच्या नोंदी निघाल्या असतील तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांच्यावरही अन्याय व्हायला नको. आता कायद्यानेच बोला. पाशा पटेल नवाचे गृहस्थ आहेत. त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली आहे. मुस्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे. हे आरक्षण कसं मिळत नाही, तेच मी बघतो. छाताडावर बसून आरक्षण घेतो, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिले.

reservation to Muslims even from OBC; Manoj Jarang’s language of taking reservation sitting on an umbrella!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात