सूरज रेवण्णा यांच्या जवळच्या सहाय्यकाने कथित पीडितेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये सहभागी प्रज्वल रेवण्णा याचा भाऊ सूरज रेवण्णा यालाही हसन पोलिसांनी अटक केली आहे. सूरजवर जेडीएस कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप आहे. कर्नाटकातील पोलिसांनी शनिवारी जेडीएस एमएलसी सूरज रेवण्णा याच्याविरुद्ध २७ वर्षीय तरुण पक्षाच्या कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सूरज रेवण्णा यांच्या जवळच्या सहाय्यकाने कथित पीडितेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.Prajwal Revannas brother Sooraj Revanna was also arrested accused of sexual abuse
होलेनर्सीपुरा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी आयपीसी कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 342 (बंदिवास), 506 (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सूरज रेवण्णा आणि शिवकुमार या दोघांना आरोपी बनवले आहे. पीडितेने हसनमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला होता. काल रात्री उशीरा बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी पीडितेचे बीपी, शुगर, ईसीजी आणि शरीरावरील खुणा तपासल्या. आज पॉटेन्सी टेस्ट होणार आहे.
गुन्हा नोंदवण्यापूर्वी पीडितेने राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. एफआयआरनुसार, पीडित मुलगी 16 जून रोजी संध्याकाळी 6.15 वाजता हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसवर सूरज रेवण्णाला भेटण्यासाठी गेली होती. आमदाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कोणाशी बोलल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीत आहे. सूरज रेवण्णा याने आपल्याला नोकरी लावून राजकारणात आणण्याचे आश्वासन दिल्याचा आरोपही फिर्यादीत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App