अंतरवलीतले सलोख्याचे वातावरण बिघडले, मनोज जरांगेंना उपोषणाची परवानगी नको; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र!!


विशेष प्रतिनिधी

जालना : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होण्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी मध्ये उद्यापासूनच उपोषणाची घोषणा केली. मात्र, अंतरवली सराटीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मनोज जरांगे यांना उपोषणाची परवानगी देऊ नये कारण अंतरवली सराटीतले जातीय सलोख्याचे वातावरण बिघडले आहे, अशी स्पष्टोक्ती केली आहे. Manoj Jarange should not be allowed to fast; Letter from Villagers to District Collector

मनोज जरांगे यांना ज्या अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी मोठा जनाधार दिला, त्याच गावाने आता त्यांची साथ सोडली आहे का??, असा सवाल समोर आला आहे. 4 जूनपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. मात्र या उपोषणाला परवानगी देऊ नये, अशी भूमिका अंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी घेतली आहे. अंतरवली सराटी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना सोमवार 3 जून रोजी निवेदन देऊन मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटीतील उपोषण व आंदोलन यास परवानगी नाकारावी, अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की : 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराटी येथे सुरु असणाऱ्या आंदोलनास आमच्या गावातील सर्व जाती-धर्माच्या समाजाचा संपूर्ण पाठिंबा होता. म्हणून आम्ही सर्व समाज आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत होतो. यासोबत सेवा देखील देत होतो. परंतु कालांतराने आंदोलनातील भाषण, चर्चा, विषय हे मन दुखावणारे आणि जातीभेद करणारे होऊ लागले. त्यामुळे मराठा सोडून इतर समाज हा आंदोलनापासून दूर झाला असून, आमच्या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील प्रेमाचे, आनंदाचे वातावरण हे भय, चिंता, द्वेष, तिरस्काराममध्ये परावर्तीत झाले आहे. यातून गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखाही बिघडला जात आहे. या जातीय तेढीतून भांडणे होऊन कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

अंतरवाली येथील उपोषणामुळे उपोषण स्थळाजवळ मंदिरातील पूजापाठ आणि धार्मिक विधीला अडचणी येत आहेत. गर्दीमुळे गावातील स्त्रियांना मंदिरात येता येत नाही. उपोषणस्थळी सभा मंडपाचे काम मंजूर झाले असून ते ही काम सुरू करता येत नाही. यामुळे गावाच्या विकासकामात अडथळा निर्माण होत आहे.

उपोषण स्थळासमोरील रस्ता हा गावातील मुख्य रस्ता आहे. गावातील शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आंदोलनामुळे या रस्तावर गर्दी होते. गावातील मुख्य रस्त्यावर महिला पुरुषांना येण्या-जाण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यत आहे. गावातील लोकांची बैठक होऊन उपोषणाला परवानगी देऊ नये असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवेदनात देण्यात आली. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Manoj Jarange should not be allowed to fast; Letter from Villagers to District Collector

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात