दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही शरीराला हानी होते.शरीराला हानी पोहचत असूनही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात.Congress MP KTS Demand of Tulsi; Said – Allow the consumption of drugs like alcohol, tobacco, gutkha by paying taxes!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमली पदार्थांचे सेवन प्रत्येकजण आपल्या जीवनात करत असतो. खूपवेळा अमली पदार्थ आयुष्यातील वेदना न्यून करतात .तसेच दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही शरीराला हानी होते.शरीराला हानी पोहचत असूनही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात ; मग अन्य अमली पदार्थांना सेवन करण्याची परवानगी का नाही ? अनेक प्रसंगी औषधांच्या माध्यमांतून अमली पदार्थ घ्यावे लागतात. असे असतांना आवश्यकता असल्यास अमली पदार्थांच्या वापरास मान्यता का दिली जाऊ नये ?, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार के.टी.एस्. तुलसी यांनी केली आहे.
आर्यन खानला अमली पदार्थांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यावर तुलसी बोलत होते.’नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टंस अॅक्ट, १९८५’ (अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५) कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे; कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो.अस तुलसी म्हणाले.
'Allow drugs to be used with taxes': Congress Rajya Sabha MP & Sr SC Advocate KTS Tulsi https://t.co/1GPjS4h8xz — Republic (@republic) October 27, 2021
'Allow drugs to be used with taxes': Congress Rajya Sabha MP & Sr SC Advocate KTS Tulsi https://t.co/1GPjS4h8xz
— Republic (@republic) October 27, 2021
‘नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टंस अॅक्ट, १९८५’ या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीवर अमली पदार्थांचे उत्पादन अथवा शेती करणे, खरेदी, विक्री, स्वत:समवेत बाळगणे, वाहतूक, सेवन आदी कृतींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या कृती करतांना कोणी सापडल्यास या कायद्यान्वये त्याच्यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App