नवाब मलिक यांचा सवाल,म्हणाले – रेव्ह पार्टी आयोजक एनसीबीच्या नजरेतून कसे सुटले ?


क्रुझवरील पार्टीत सुमारे १३०० लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते. परंतु फक्त १३ जणांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.Nawab Malik’s question, he said – How did the Rev Party organizer escape the notice of the NCB?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारे समीर दाऊद वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहेत. याचाच अर्थ यांनी खोटेपणा केला आहे आणि म्हणून मुंबई पोलिसांना ते घाबरत आहेत’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, क्रुझवर रेव्ह पार्टी आयोजित केली होती, असे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) म्हणणे असेल, तर मग त्या पार्टीत सहभागी झालेल्या सर्वानाच ताब्यात का घेण्यात आले नाही, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टी आयोजक नजरेतून कसे सुटले, मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांचा एकेरी उल्लेख केला व निशाणा साधला.



तसेच सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला केले आहेत. क्रुझवरील पार्टीत सुमारे १३०० लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते. परंतु फक्त १३ जणांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पार्टीचा आयोजक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा मित्र आहे.

त्यामुळेच जाणूनबुजून त्याला बाजूला करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी के ला. दरम्यान, वानखेडे यांनी न्यायालयात जाऊन मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण न देता माझी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा, अशी विनंती के ली आहे.

मुंबई पोलिसांविषयी त्यांनी अविश्वास दाखवला आहे, याचा अमली पदार्थ कारवाई प्रकरणाची काहीतरी काळेबेरे आहे, असा संशय घेण्यास वाव असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

Nawab Malik’s question, he said – How did the Rev Party organizer escape the notice of the NCB?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात