वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका


वृत्तसंस्था

सिल्वासा : गरिबांना लुटणे, वसुली करणे आणि पायदळी तुडविणे हा विरोधकांचा एकमेव धंदा आहे. अनेक लोक घाबरून बोलत नाहीत.पण, त्यांच्या या अन्यायाला मतदानातून उत्तर द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.Extortion is the opposition Party policy ; Smriti Irani alleges Shivsena in dadra Nagar Haveli Public meeting

दादरा नगर हवेली येथे लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे उमेदवार महेश गावित यांच्या प्रचार सभेत इराणी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव व दनाह व दमण दीवच्या प्रभारी विजया रहाटकर, भाजपचे उमेदवार महेश गावित, प्रदेशाध्यक्ष दिपेशतांडेल, माजी खासदार नटूभाई पटेल, सिल्वासा शहराध्यक्ष राकेशसिंह चौहान, ज्येष्ठ नेते फतेसिंग चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.



त्या म्हणाल्या, कमळ हे भाजपचे चिन्ह आहे. तसेच ते वैभवाचे प्रतीक आहे. या उलट विरोधकांचे चिन्ह हे निरपराध लोकांच्या रक्ताने माखलेले आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असून विरोधकांच्या नेत्यांचा पत्ताच नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.

केंद्रीय मंत्री भरती पवार म्हणाल्या, असा नेता निवडून द्या की जो जनतेसाठी काम करतो. जनतेचे हित न पाहता स्वतःची घरे भरणारे नेते नकोत. काहीही करून महेश गावित यांनाच निवडून आणायचे आहे.महेश गावित म्हणाले, विरोधकांची सेना ही जनतेत दहशत माजविणारी आहे. पण, आम्ही घाबरणार नाही आणि मागे फिरणार नाही.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सिंपल बेन काटेला, उपाध्यक्ष कपिला पांचाळ, सिल्वासा जिल्हाध्यक्षा सुनंदा कचवे, खानवेल जिल्हाध्यक्षा शांती कुरकुटिया, सिल्वासा शहर अध्यक्षा हेमलता चौहान आदी प्रमुखांनी बैठकीचे आयोजन केले होते.

जा त्यांना विचारा, तुम्ही काय केले ?

“आमचे नेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी कोरोनाच्या संकटात देशातील ८० कोटी नागरिकांना चौदा महिने अन्नधान्य दिले. १०० कोटी लोकांना मोफत लसीकरण केले. २२ कोटी महिलांच्या बँक खात्यात तीस हजार कोटी रुपये थेट ट्रान्सफर झाले.

उज्ज्वला गॅस कोट्यवधी महिलांच्या घरात पोहोचले. शौचालये बांधून महिलांच्या सन्मानाचे रक्षण केले. भाजपला विरोध करणाऱ्यांकडे जा आणि त्यांनी काय केले ते विचारा, असे आवाहन स्मृती इराणी यांनी सभेत उपस्थित शेकडो महिलांना केले.

Extortion is the opposition Party policy ; Smriti Irani alleges Shivsena in dadra Nagar Haveli Public meeting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात