वृत्तसंस्था
मॉस्को : जगातील कोरोनाविरोधात पहिली लस बनविणाऱ्या रशियात कोरोनाने पुन्हा थैमानघातले असून गेल्या २४ तासांत ४० हजार जणांना कोरोना झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजधानी मॉस्कोसह अन्य शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.Corona virus: 40,000 corona patients in Russia in 24 hours, strict restrictions imposed in Moscow and many cities
कोरोनाची पहिली लस स्फुटनिक रशियाने तयार केली. मात्र लसीकरण मोहीम वेगाने राबविली नाही. त्याचे दुष्परिणाम रशियाला भोगावे लागत आहेत. एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या ३२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोनाचे ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले असून, १,१५९ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे मॉस्को व अन्य शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अनेक व्यवहार सध्या बंद ठेवले आहेत, तर काही ठिकाणी मर्यादित संख्येने लोकांना प्रवेश देण्याचे बंधन घातले आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख ३५ हजार ५७ लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या युरोप खंडातील कोरोना बळींपेक्षा जास्त आहे. शनिवार, ता. ३० ऑक्टोबरपासून ते ७ नोव्हेंबर दरम्यान, रशियामध्ये सरकारी व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App