भाजपचे कमळ म्हणजे ‘लुटीचे फूल’ , अखिलेश यादव यांची टीका


विशेष प्रतिनिधी

लखनौ – भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचे फूल हे आता ‘लुटीचे फूल’ बनले आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.यापूर्वीच्या सरकारच्या काळात गरीबांच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केला जात होते.Akhilesh yadav targets BJP

आता या फुलाच्या नावाखाली चोवीस तास लोकांची फसवले जात असल्याचेही यादव म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीबांना लक्ष्य केले जात आहे. गरीबांचा खिसा कापणे आणि गरीब कुटुंबाना सर्व सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे तत्कालिन समाजवादी पक्षाच्या सरकारला ‘भ्रष्टाचाराची सायकल’ असा टोमणा मारला होता. समाजवादी पक्षाच्या सरकारने राज्यात आरोग्य सुविधेवर कोणतेच काम केले नसल्याचेही मोदी यांनी म्हटले होते.

सिद्धार्थनगर येथे त्यांनी अखिलेश यादव यांचे थेटपणे नाव न घेता त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह सायकलची खिल्ली उडवली होती. रुग्णवाहिका खरेदीत भ्रष्टाचार, नियुक्त्या, बदल्या यातही भ्रष्टाचार केला आणि यामुळे यातून काही घराणे मालमाल झाले, अशी टीका पंतप्रधानांनी केली होती.

यास अखिलेश यादव यांनी आज सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले आहे. हिंदीतून ट्विट करत म्हटले की, निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना भाजपकडून नवीन योजना सुरू केल्या जात आहेत.

Akhilesh yadav targets BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात