उत्तर प्रदेशात अखिलेश यादव – ओमप्रकाश राजभर एकत्र; मग असदुद्दीन ओवैसी वाऱ्यावर का??


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात आज जोरदार राजकीय हालचाली झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गौतम बुद्धांच्या कुशीनगर मधून एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. त्याच वेळी राहुल गांधींनी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन दलित मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश सरकारने प्रियंका गांधी यांना आग्र्याला जाण्यापासून रोखून काँग्रेसच्या हाती नवा मुद्दा दिला, तर चौथी कडे समाजवादी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सोहेल देव समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी आज एकत्रितपणे उत्तर प्रदेश निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.Samajwadi Party and Suheldev Bharatiya Samaj Party enter into alliance, ahead of 2022 Uttar Pradesh Assembly elections

 

दोन पक्षांची आघाडी झाल्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले इतकेच नाही तर जात पंचायतीच्या कार्यक्रमात ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांना निमंत्रणही दिले त्या निमंत्रणाचा अखिलेश यादव यांनी स्वीकार केल्याचे सांगितले.

ओमप्रकाश राजभर यांनी गेल्यावर्षी हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाबरोबर आघाडी केल्याची घोषणा केली होती. दोन्ही नेत्यांच्या एकत्रित रॅली देखील उत्तर प्रदेशात पार पडल्या होत्या. परंतु आता ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्याशी हातमिळवणी केल्याने असदुद्दीन ओवैसी यांना त्यांनी राजकीयदृष्ट्या वाऱ्यावर सोडले काय?, याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सोहेल देव समाज पार्टीचा प्रभाव सर्वसाधारणपणे पूर्वी उत्तर प्रदेशात म्हणजे पूर्वांचल मध्ये साधारण 100 मतदारसंघांमध्ये आहे. तेथे सोहेल देव समाजाची साधारण 15 ते 18 टक्के मते आहेत असे मानले जाते. त्या मतांवर भिस्त ठेवून राजभर आणि अखिलेश यादव एकत्र आले आहेत.

ओमप्रकाश राजभर यांनी 2017 च्या निवडणुकीत भाजपशी युती केली होती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते काही काळ मंत्री देखील होते. परंतु मधल्या काळात भाजपशी त्यांचे फाटले. 2019 नंतर त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्याशी राजकीय जवळीक साधली होती. परंतु, आता उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका अवघ्या पाच सहा महिन्यांवर आली असताना ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी युती करून ऐनवेळेला ओवैसी यांना वाऱ्यावर सोडल्याचे मानले जात आहे.

Samajwadi Party and Suheldev Bharatiya Samaj Party enter into alliance, ahead of 2022 Uttar Pradesh Assembly elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात