शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत


शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. ईडीने खा. भावना गवळी यांना दुसरा समन्स पाठवला होता. खा. गवळी यांनी पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांनी चिकनगुनियाचे कारण दिले आहे. यामुळे त्यांनी मनी लाँडरिंगप्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. भावना गवळी या यवतमाळ- वाशिमच्या शिवसेना खासदार आहेत. Shiv Sena MP Bhavana Gawali will not appear before ED today, Demands relief For 15 days because of Chikungunya


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. ईडीने खा. भावना गवळी यांना दुसरा समन्स पाठवला होता. खा. गवळी यांनी पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांनी चिकनगुनियाचे कारण दिले आहे. यामुळे त्यांनी मनी लाँडरिंगप्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. भावना गवळी या यवतमाळ- वाशिमच्या शिवसेना खासदार आहेत.

ईडीने भावना गवळी यांना आज (20 ऑक्टोबर) चौकशीसाठी बॅलार्ड पियर्ड कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यांना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईडीने भावना गवळी यांना दुसरा समन्स बजावला आहे. तथापि, गवळी यांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. याआधी 4 ऑक्टोबरला त्यांना बोलावले होते. पण त्या चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या. ईडीला गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 72 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करायची आहे. 12 ऑक्टोबर रोजी तपास झाला. त्या आधारे, ट्रस्टच्या प्रमुख भावना गवळींची आता चौकशी केली जाणार आहे.

भावना गवळी यांच्यावर काय आहेत आरोप?

खा. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भावना गवळी यांची त्या प्रकरणांमध्ये ईडीला चौकशी करायची आहे. ईडीने त्यांना 4 ऑक्टोबर रोजी समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते. पण त्या अनुपस्थित राहिल्या आणि त्यांनी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली. आता हा कालावधी संपला आहे. पण भावना गवळी यांनी पुन्हा एकदा चिकनगुनियाचा हवाला देत 15 दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे. त्यांच्यावर महिला प्रतिष्ठान ट्रस्टचे एका खासगी कंपनीत रूपांतर करून कंपनीच्या खात्यात कोट्यवधी रुपये बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे.हरीश सारडा यांनी गवळी यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर ईडीने तपास सुरू केला. 1992 मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना सुरू केला. या कारखान्यासाठी राज्य सरकारच्या संमतीने राष्ट्रीय सहकारी महामंडळाकडून 43 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. 2002 मध्ये गवळी यांनी या कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदेशीरपणे महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. या खरेदी -विक्रीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. या सर्व आरोपांबाबत ईडीने 20 ऑक्टोबर रोजी भावना गवळी यांना त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

Shiv Sena MP Bhavana Gawali will not appear before ED today, Demands relief For 15 days because of Chikungunya

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण