कोरोनाची लस घ्या, नवीकोरी मोटार घेऊन जा ; रशियामध्ये लसीकरणासाठी अभिनव योजना

वृत्तसंस्था

मॉस्को : कोरोनाची लस घ्या आणि नवीकोरी मोटार घेऊन जा, अशी अभिनव योजना रशियामध्ये राबविली आहे. लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी ही मोहीम रराबविण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये लसीकरण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळावा आणि अभियानाला गती यावी यासाठी मोटार देण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. Take the corona vaccine and take a Brand new Car; Innovative scheme for vaccination in Russiaमॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतची मोटार दिली जाईल, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून रशियामध्ये लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यामुळे हा उपक्रम राबवला जात आहे.
महापौर सर्गेई सोबयानिन म्हणाले, १४ जूनपासून ज्यांचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे अशांनी लसीचा पहिला डोस घेतल्यास ते या योजनेचा भाग बनतील. अशा सर्व व्यक्ती लकी ड्रॉतून मोफत मोटार मिळवण्यास पात्र असतील. ११ जुलैपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत २० मोटारी मोफत दिल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यात ५ मोटारी दिल्या जातील. पहिल्यांदा लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावरच या योजनेसाठी नोंदणी करता येईल.

Take the corona vaccine and take a Brand new Car; Innovative scheme for vaccination in Russia

महत्त्वाच्या बातम्या