वृत्तसंस्था
पुणे : लोणावळा शहर आणि ग्रामीणचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात करावा, असा प्रस्ताव पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस महासंचालकांना पाठविला होता. आता या प्रस्तावावर संबंधिताकडून तत्काळ अभिप्राय मागवला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिस ठाणे पोलिस आयुक्तालयाचा भाग बनणार आहे. Now Lonavla is within the boundaries of Pimpri Chinchwad?
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामपंचायतीकडून अभिप्राय घेण्यास सांगितले आहे. तसेच ग्रामसभेतील ठराव व त्यावरील निर्णय ग्रामपंचायतीकडून प्राप्त करून कार्यालयात त्वरीत सादर करावा, असे निर्देशही दिले आहेत.
आयुक्तालयातील पोलिस ठाणी
पिंपरी चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तसेच पुणे ग्रामीण मधील चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व देहूरोड
ग्रामीण हद्दीतील ठाणी
ओतूर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, खेड, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, इंदापूर, वालचंद नगर,भिगवण, दौंड, येवत, बारामती शहर, बारामती तालुका, जेजूरी, सासवड, भोर, राजगड, वेल्हा, पौंड,वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे.
ग्रामीणचे महत्व कमी होणार?
पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे , तळेगाव एमआयडीसी व देहूरोड या पाच ठाण्यांचाचा पिंपरी चिंचवड आयुक्तलायत समावेश झाला आहे. नव्याने वडगाव, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या ठाण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुणे ग्रामीण पोलिस कार्यालयाचे अधिकार क्षेत्र कमी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App