ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस आणि बंधू मार्क २० जुलैला अवकाशात फेरी मारणार


विशेष प्रतिनिधी

केप कॅनव्हेराल – ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बोझेस आणि त्यांचे बंधू मार्क हे २० जुलैला अल्पकाळासाठी अवकाशात फेरी मारणार आहेत. त्यांच्याबरोबर जाण्याची संधी एका व्यक्तीला दिली जाणार आहे.Jef Bozes will travel in universe

त्यासाठी ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत भाग घेत एका व्यक्तीने २.८० कोटी डॉलरला ही संधी मिळविली आहे. या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आले नसून प्रत्यक्ष उड्डाणाच्या काही दिवस आधी ते जाहीर केले जाईल. अमेरिकेचे अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते, त्या घटनेला २० जुलैला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत.



त्यानिमित्त हे उड्डाण होणार आहे. या लिलावात १५९ देशांमधील ७५०० लोकांनी सहभाग घेतला होता. लिलावातून मिळालेली रक्कम युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वापरली जाणार आहे.

Jef Bozes will travel in universe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात