महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगण्याची गरज नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवाशांना आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट (आरटीपीसीआर) सोबत बाळगण्याची आता गरज नाही. Delhi-bound passengers from Maharashtra, Andhra Pradesh and Telangana are not required to carry a negative RT-PCR test report anymore.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. परंतु दिल्लीतून पुन्हा या तिन्ही राज्यात जाताना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत.



या संदर्भातील नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली. एप्रिलमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने दिल्लीबाहेरील राज्यातील विमान प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणे बंधनकारक केले होते. तसेच तो ७२ तासापूर्वीचा नसावा , असा नियम केला होता. पण, आता परिस्थिती सुधारल्याने बंधन शिथील केले आहे. ज्यांच्याकडे हा रिपोर्ट नसेल त्याला १४ दिवस होम क्वारंटाइन केले जात होते, असे दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

एअर विस्तरा आणि स्पाईस जेट या कंपन्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. स्पाईस जेटने म्हंटले आहे की, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवाशांना आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट (आरटीपीसीआर) सोबत बाळगण्याची आता गरज नाही. परंतु, राज्याचे विमान प्रवासाचे नियम काय आहेत? हे प्रवासापूर्वी पाहावे, असा सल्ला दिला आहे.

Delhi-bound passengers from Maharashtra, Andhra Pradesh and Telangana are not required to carry a negative RT-PCR test report anymore.

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात