काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर रलढण्याची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारले आहे. राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नाही, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता नाना पटोलेंना सुनावले आहे.Ajit Pawar told Nana Patole that if someone is making a statement, it does not matter
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर रलढण्याची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारले आहे. राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे.
त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नाही, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता नाना पटोलेंना सुनावले आहे.राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी जागा असलेल्या कॉँग्रेसलाही आता सत्तेची स्वप्ने पडत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर त्यापुढे जाऊन हायकमांडने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असेही म्हटळे आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक म्हणाले, नाना पटोले यांनी त्यांचा पक्ष पुढील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. कोणालाही एखाद्या पदाची अपेक्षा करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तसंच पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावे लागते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more