रामद्रोहींकडून राजकीय फायद्यासाठी जमीन खरेदी व्यवहारात अनियमिततेचा आरोप, काडीचाही संशय नसल्याने चौकशी होणार नाही, विश्व हिंदू परिषदेने केले स्पष्ट


श्रीराम मंदिर निर्माणासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीच्या व्यवहारात अनियमिततेचा आरोप करणारे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळविण्याचा आरोप करत आहे. राम मंदिराच्या निर्माणाच्या प्रत्येक टप्यावर अडथळे उभे करायचे आहेत. श्रीरामांना काल्पनिक म्हणणारे हेच रामद्रोही आहेत. चंपत राय यांच्यासारख्यांची अनेक दशकांपासूनची तपस्या आणि संघर्षावर डाग लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी ठणकावून सांगितले आहे.Vishwa Hindu Parishad has clarified that there will be no inquiry as there is no suspicion of irregularities in land purchase


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : श्रीराम मंदिर निर्माणासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीच्या व्यवहारात अनियमिततेचा आरोप करणारे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळविण्याचा आरोप करत आहे. राम मंदिराच्या निर्माणाच्या प्रत्येक टप्यावर अडथळे उभे करायचे आहेत.

श्रीरामांना काल्पनिक म्हणणारे हेच रामद्रोही आहेत. चंपत राय यांच्यासारख्यांची अनेक दशकांपासूनची तपस्या आणि संघर्षावर डाग लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी ठणकावून सांगितले आहे.



आलोक कुमार म्हणाले, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला माझा सल्ला आहे की त्यांनी खोटे आरोप करणाºयांवर अब्रुनुकसानीचा दावा केला पाहिजे. यापूर्वीही दोन वेळा खोटे आरोप करण्यात आले. त्यांनी माफी मागितल्यावर क्षमा करण्यात आली. मात्र, आता तसे करून चालणार नाही. हा सगळा वाद तथ्यहिन आणि भ्रामक आहे.

जमीन खरेदी व्यवहारात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही. जी जमीन १८.५ कोटी रुपयांना विकत घेतली तिचा सध्याच्या बाजारभावाने मूल्य २० कोटी रुपये आहे. २०१२ मध्ये कुसुम पाठक व हरीश पाठक यांनी त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे जमीन सुल्तान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांना विकली होती.

त्याचे अ‍ॅग्रिमेंट टू सेल केले होते. नऊ वर्षांच्या कार्यकाळात अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत असल्याने तसेच उत्तर प्रदेश सरकार अनेक योजना राबविणार असल्याने जमीनीचा भाव कित्येक पटींनी वाढला आहे.

ही जमीन अयोध्या रेल्वेस्टेशनच्या जवळ आहे. तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जमीन करेदी करण्यासाठी कुसुम पाठक, सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी या तिघांशीही चर्चा केली होती. या तिघांपैकी कोणीही एक जण जमीन विकू शकत नव्हता.

त्यामुळे ठरविले गेले की अ‍ॅग्रिमेंट टू सेल अंतर्गत कुसम पाठक यांनी ही जमीन सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकावी. त्यानंतर ट्रस्टने ती खरेदी करावी. एकाच वेळी हे दोन्ही व्यवहार करावेत. त्यामुळे स्टॅँम्प पेपर आणण्यासाठीही एकच व्यक्ती गेली होती.

Vishwa Hindu Parishad has clarified that there will be no inquiry as there is no suspicion of irregularities in land purchase

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात