कर्नाटकाच्या झेंड्याच्या रंगाची बिकिनी आणि राजचिन्हही, अ‍ॅमेझॉनवर कन्नड नागरिक संतप्त


ई-वाणिज्य कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या कॅनडा देशातील संकेतस्थळावर कर्नाटकाच्या झेंड्याच्या रंगाची आणि राज्यचिन्ह असलेली बिकिनी विक्रीसाठी ठेवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कन्नड नागरिक संतप्त झाले आहेत.Kannada citizens angry over Amazon’s flag-colored bikini and emblem


प्रतिनिधी

बंगळुरू: ई-वाणिज्य कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या कॅनडा देशातील संकेतस्थळावर कर्नाटकाच्या झेंड्याच्या रंगाची आणि राज्यचिन्ह असलेली बिकिनी विक्रीसाठी ठेवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कन्नड नागरिक संतप्त झाले आहेत.

कर्नाटकचे कन्नड आणि संस्कृती मंत्री अरविंद लिंबावली यांनी म्हटले आहे की सरकारकडून अ‍ॅमेझॉनवर कायदेशीर कारवाई केली जाईल. हा प्रकार कन्नड जनतेच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. सरकार अशा गोष्टी सहन करणार नाही आणि अ‍ॅमेझॉनला माफी मागण्यास सांगितले आहे.



काही दिवसांपूर्वी गूगलने कन्नड भाषेला भारतातील सर्वात खराब भाषा म्हणून दाखवले होते. याबाबत लिंबावली म्हणाले, आम्ही नुकताच गूगलने कन्नडच्या केलेल्या अपमानाचा सामना केला आहे. ही जखम भरते न भरते तोपर्यंत अ‍ॅमेझॉनवर कर्नाटकाच्या झेंड्याच्या रंग महिलांच्या वस्त्रांवर वापरले जात असल्याची बातमी आम्हाला कळली.

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुन्हा पुन्हा कन्नडचा अपमान करणे बंद करावे. हा कन्नडिगांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि आम्ही पुन्हा पुन्हा अशा घटना सहन करणार नाही. अ‍ॅमेझॉनने कन्नडिगांची माफी मागावी . त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,असेही लिंबावली म्हणाले आहेत.

Kannada citizens angry over Amazon’s flag-colored bikini and emblem

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात