राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीच्या कथित घोटाळा वादात काँग्रेसची उडी; सुप्रिम कोर्टाकडून चौकशीची मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीनीच्या व्यवहारातील कथित घोटाळ्याच्या आरोपांच्या वादामध्ये काँग्रेसने उडी घेतली असून या कथित घोटाळ्याची चौकशी सुप्रिम कोर्टाकडून करावी, अशी मागणी केली आहे. We demand Supreme Court take cognizance of the matter & order SC-monitored probe. Congress’ Randeep Surjewala on alleged irregularities in land purchase by Ram Temple trust

राम मंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराबाबत आज सकाळपासून माध्यमांमध्ये चर्चा सुरू होती. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंग यांनी हा कथित घोटाळा बाहेर काढला. मात्र, त्यावर राम मंदिर ट्रस्टकडून लगेच खुलासाही करण्यात आला.



याबद्दल दिवसभराच्या चर्चेत काँग्रेसने काही भूमिका मांडली नाही. पण सायंकाळी उशीरा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला जमीन खरेदीच्या या कथित घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करून काँग्रेसने या वादामध्ये उडी घेतल्याचे सूचित केले. ते म्हणाले, की सुप्रिम कोर्टाने स्वतःहून या घोटाळ्याची दखल घेतली पाहिजे. आपल्या देखरेखीखाली त्याची चौकशी केली पाहिजे.

राम मंदिर ट्रस्टला देणगीरूपात मिळालेला पैसा आणि ट्रस्टने खर्च केलेली रक्कम याचे लेखापरीक्षण सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीखाली झाले पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.

We demand Supreme Court take cognizance of the matter & order SC-monitored probe. Congress’ Randeep Surjewala on alleged irregularities in land purchase by Ram Temple trust

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात