रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय षडयंत्र, जमीन बाजारभावानुसारच खरेदी, चंपत रॉय यांनी केले स्पष्ट


राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून फक्त रामभक्तांना दिशाभूल करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचे रॉय म्हणाले. जमीन बाजारभावानुसारच खरेदी केली आहे, असे राममंदिर ट्रस्टचे सरचिटणिस चंपत रॉय यांनी सांगितले.Political conspiracy to mislead devotees, purchase of land at market price, explained by Champat Roy


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून फक्त रामभक्तांना दिशाभूल करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचे रॉय म्हणाले. जमीन बाजारभावानुसारच खरेदी केली आहे, असे राममंदिर ट्रस्टचे सरचिटणिस चंपत रॉय यांनी सांगितले.

ट्रस्टचे म्हणणे आहे की, सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून बाग बिजेरची जमीन खरेदी केली होती. त्यानुसार त्याचा दर दोन कोटी रुपयांत निश्चित करण्यात आला होता व याची नोंददेखील करण्यात आली होती.



ज्यावेळी मंदिराने ही जमीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी पाठक कुटुंबिंयाकडून 18 मार्च 2021 रोजीच्या बाजार भावाने दर निश्चित केले व आजच्या दरानुसार ते मंदिर ट्रस्टला विकले.ट्रस्टने मंदिर विस्ताराची योजना आखली असून यासाठी 108 एकर जमिन लागणार आहे. यापूर्वी मंदिर संकुल 3 एकरात होते ते आता 5 एकरात बांधले जाईल.

मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 70 एकर जमीन खरेदी केली जात आहे. अलीकडेच ट्रस्टने जवळ पासची दोन मंदिरे 4-4 कोटींमध्येही खरेदी केली आहेत. ज्या लोकांकडून या जमिनी घेतल्या जात आहेत, त्या लोकांनाही इतरत्र जागा देण्यात येत आहे.

Political conspiracy to mislead devotees, purchase of land at market price, explained by Champat Roy

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात