राम मंदिर उभारणीतील रामभक्तांना मंत्री भिकारी म्हणतात, शिवसेनेचे हे कोत्या प्रकारचे हिंदूत्व, राम कदम यांचा सवाल


राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात. शिवसेनेचे हे कोणत्या प्रकारचे हिंदुत्व आहे, असा सवाल देखील राम कदम यांनी विचारला. Mantri beggars are the devotees of Ram in the construction of Ram temple


विेशेष प्रतिनिधी

मुंबई : राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात.शिवसेनेचे हे कोणत्या प्रकारचे हिंदुत्व आहे, असा सवाल देखील राम कदम यांनी विचारला.

भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावरून भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.अब्दुल सत्तार यांनी राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्यांना म्हटल्याने रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागितली पाहिजे अशी मागणी कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे.

शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलनात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राम मंदिर उभारण्याच्या कार्यासाठी मुंबईतून भाजपा कार्यकर्ते ठिकठिकाणी देणगी गोळा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत आहे. मात्र मुंबई महानगर पालिका व पोलिस राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर काढत असल्या बद्धल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

शिवसेनाप्रमुखांना राम मंदिराबद्धल विशेष आस्था होती. देशात राम मंदिर निर्माण कार्याला काँग्रेस व अन्य पक्षांकडून विरोध होत असताना शिवसेनाप्रमुख व संघ परिवार भाजपाच्या मागे खंबीरपणे उभा होता याची आठवण देखील खासदार शेट्टी यांनी आपल्या पत्राद्वारे करून दिली आहे.

Mantri beggars are the devotees of Ram in the construction of Ram temple

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती