विशेष प्रतिनिधी
डेहराडून : चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग जिल्ह्यांसाठी चारधाम यात्रा करता येणार आहे. उत्तराखंडमध्ये संचारबंदीत वाढ केलेली असताना तीन जिल्ह्यातील नागरिकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी दिली आहे. अर्थात चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआरचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. राज्यातील तीन जिल्ह्यातील भाविकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु आरटीपीसीआर बंधनकारक आहे. परंतु राज्यातील सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, क्रीडांगण, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडोटोरियम, बार बंदच राहणार आहेत. Char dham yatra reopens
चारधाम यात्रा यंदाही लांबणीवर, उत्तराखंडमधील अर्थकारणाला मोठा फटका बसणार
राज्यांतील मिठाईचे दुकान आठवड्यातील पाच दिवस सुरू राहणार असून अन्य दुकानांना तीन दिवसांची परवानगी असेल. राजधानी डेहराडून येथे विक्रम सेवा, टेम्पो सेवा आणि शहर वाहतूक सुरु राहणार आहे. विवाह सोहळ्यात आता ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. कोवीड संचारबंदीच्या काळात आंतरराज्यीय वाहनांची वाहतूक शंभर टक्क्यांसह सुरू होणार आहे. सरकारने शंभर टक्के क्षमतेसह बस सुरू करण्यास परवानगी सरकारने दिल्याने आजपासून बस सुरू झाल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App