चारधाम यात्रा यंदाही लांबणीवर, उत्तराखंडमधील अर्थकारणाला मोठा फटका बसणार


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाची चारधाम यात्रा लांबणीवर टाकण्यात आली आहे. पुढील महिन्यात ही यात्रा सुरु होणार होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही यात्रा उशिरा सुरु झाली होती. चारधाम यात्रा उत्तराखंड सरकारच्या अर्थकारणाचा कणा मानली जाते.Char dham yatra postponed due to corona

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी गुरुवारी ही घोषणा केली. संसर्ग वाढत असल्यामुळे यात्रा ठरल्यानुसार आयोजित करणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की,हिमालयातील चार प्रसिद्ध मंदिरे नियोजित दिवशी खुली होतील. दैनंदिन पूजेसाठी केवळ पुजाऱ्यांना परवानी असेल. राज्यातील तसेच बाहेरील कोणत्याही भाविकाला प्रवेश नसेल.

वेळापत्रकानुसार यमुनोत्रीचे मंदिर १४ मे रोजी दुपारी १२.१५, गंगोत्री १५ मे रोजी सकाळी ७.३०, केदारनाथ १५ मे रोजी पहाटे पाच, बद्रीनाथ १८ मे रोजी पहाटे ४.१५ उघडण्याची अपेक्षा आहे.

अलीकडेच उत्तराखंड उच्च न्यायालयाने तोंडी निरीक्षण नोंदविले होते. चारधाम यात्रेसाठी सरकारने प्रमाणित दिशानिर्देश जारी करावेत, असे न्यायालयाने म्हटले होते. ही यात्रा कुंभमेळ्याप्रमाणे आणखी एक सुपरस्प्रेडर होता कामा नये,

असेही न्यायालयाने नमूद केले होते. वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवून राज्य सरकारने लोकांचे जीव वाचवावेत, अशी सूचनाही न्यायालयाने केली.

Char dham yatra postponed due to corona

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था