विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात आठवडाभरापासून कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५.८ टक्के आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, ठाणे, औरंगाबाद येथील पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे; मात्र आता हळूहळू या जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दरातही घट होत आहे. फक्त कोल्हापूर यास अपवाद आहे. गेल्या आठवड्यात १५.८५ असणारा पॉझिटिव्हीटी दर वाढून १६.६ टक्के आहे. राज्यातील हा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर आहे. Corona positivity rates deepens
मुंबईचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर वेगाने घसरत असून तो २.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र मुंबई शहरालगतच असलेल्या ठाणे, रायगड जिल्ह्यात अजूनही पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याने तेथे चिंता कायम आहे. सध्या ठाणे व रायगड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अनुक्रमे ७.८३ आणि १३ टक्के आहे.
रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने मुंबईत विलगीकरणासाठी राखीव असलेल्या रिक्त खाटांची संख्याही वाढत आहे. मुंबईत सध्या विलगीकरणासाठी २१ हजारांहून अधिक खाटा रिक्त आहेत; तर ८,५३४ ऑक्सिजन खाटा, १ हजार आयसीयू खाटा आणि ३८९ व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App