आयएसआय झाली आधुनिक!, आता दहशतवादी हल्यांसाठी महिलांचाही वापर

पाकिस्तानची गुप्तचर संस्था  आयएसआयही आता वेगळ्या अर्थाने आधुनिक झाली आहे. आता आयएसआयकडून महिलांनाही दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देऊन दहशतवादी हल्ले घडविण्याची योजना आखली आहे.ISI has become modern !, now women are also used for terrorist attacks


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पाकिस्तानची गुप्तचर संस्था  आयएसआयही आता वेगळ्या अर्थाने आधुनिक झाली आहे. आता आयएसआयकडून महिलांनाही दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देऊन दहशतवादी हल्ले घडविण्याची योजना आखली आहे.

तालिबान  , जैश-ए-मोहम्मद आणि इसिसच्या दहशतवाद्यांच्या मदतीने अफगाणिस्तानात  मोठे दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली आहे.  आयएसआयच्या  मदतीने पाकिस्तानमधून अफगाणिस्तानात जाऊन आयएसआयएसचे दहशतवादी बनलेल्या 24 महिला दहशतवाद्यांची यादीच सध्या व्हायरल झाली आहे.या दहशतवादी महिला अफगाणिस्तानात काबुल तुरूंगात कैद आहेत. या महिलांविषयी अफगाणिस्तानच्या यंत्रणांचे म्हणणे आहे की, या सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळले आहे.

पाकिस्तान-अफगाणीस्त सीमेवर अफगाणिस्तानच्या क्षेत्रात, आयएसआयने तालिबानी, जैश आणि इसिसच्या दहशतवाद्यांची अनेक दहशतवादी शिबिरे सुरु केली आहेत, ज्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. येथून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी अफगाणिस्तानात हल्ले घडवून आणत आहेत.

त्याचवेळी  काही दहशतवाद्यांना भारताच्या काश्मीरमध्ये   हल्ला करण्यासाठी पाठवले जाते. त्यांना भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सांगितले जाते. यातील बरेच दहशतवादी कुटुंबासह म्हणजेच संपूर्ण कुटुंबासमवेत येतात आणि दहशतवादी छावण्यांमध्ये सामील होतात, अशी माहिती पुढे आली आहे.

अफगाणिस्तान सुरक्षा दलांच्या कारवाईत पकडलेल्या पाकिस्तानी वंशाच्या काही महिला दहशतवाद्यांनी खुलासा केला आहे की त्यांना  कधी आणि कोठे हल्ले करायचे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आयएसआयकडून शस्त्रे पुरविली जातात.

ISI has become modern !, now women are also used for terrorist attacks

महत्त्वाच्या बातम्या