राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा होण्याचा मान आता बुलढाणा जिल्ह्याला ; सध्या ४३ रुग्ण


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे एक जिल्हा संपूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. या जिल्ह्यात अवघे ४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे हा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. Buddhana Will be first district in Maharashtra with Zero covid cases soon , Only 43 active cases remains

महाराष्ट्रात शनिवारी एकूण 1,55,474 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वात कमी सक्रिय रुग्ण हे बुलढाणा जिल्ह्यात आहेत. आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यात अवघे 43 सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे हा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 82032 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यापैकी 81350 रुग्णांनी मात केली आहे. तर 634 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या अवघे 43 सक्रिय रुग्ण आहेत.

परभणीत एकही रुग्ण नाही

राज्यात आज एकूण 10697 नवीन रुग्णांची नोंद झाली. मात्र, परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत आज एकही रुग्णाची नोंद झालेली नाही.

Buddhana Will be first district in Maharashtra with Zero covid cases soon , Only 43 active cases remains

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात