विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तमिळनाडूत एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सत्तेच्या चाव्या पडद्याआडून हलविणाऱ्या वादग्रस्त नेत्या शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान आता पुरते उध्वस्त झाले आहे. अगदी त्यांच्याशी साधा सवाद ठेवण्यासही आता पक्षाने बंदी घातली आहे.Shashikala’s position in Anna DMK completely ruined, 17 members expelled due
केवळ त्यांच्याशी संपर्क ठेवल्याबद्दल १७ जणांची पक्षातून हकालपट्टी झाली आहेशशीकला याआधी हंगामी सरचिटणीस होत्या. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शशीकला यांच्याशी संवादाद्वारे जवळीक साधू नये,
अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा कडक इशारा अण्णाद्रमुक पक्षातर्फे आधीच देण्यात आला होता. त्याचे आता कृतीत रूपांतरही करण्यात आले आणि १७ सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली. ज्यात पक्षाचे प्रवक्ते व्ही. पुगाझेंधी यांचा समावेश आहे.
पक्षाच्या आमदारांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात झाली. तीन तास चाललेल्या बैठकीत फोन कॉल लीक होण्यावरून बरीच चर्चा झडली. शशीकला आणि पक्षाच्या काही नेत्यांमधील संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. आपण नजीकच्या भविष्यात पक्षात पुनरागमन करू असे शशीकला यांनी म्हटल्याचे समजते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App