मेंदूचा शोध व बोध :भावप्रज्ञेचे पैलू विकसित करा

स्वतःच्या भावना ओळखणं, त्या हाताळता येणं व नियंत्रणात ठेवता येणं हे भावप्रज्ञेचे पहिले दोन पैलू. यानंतरचे पैलू असे आहेत. स्वयंप्रेरित असणे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, तसंच एखादं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यावरच आपल्या सर्व भावना केंद्रित करता यायला हव्यात. ते उद्दिष्ट हा आंतरिक ध्यास व्हायला हवा. त्या कामातून आनंद घेता यायला हवा म्हणजे ते काम कष्टदायक वाटतच नाही. त्याचवेळी त्या कामाच्या आड येणाऱ्या,Develop aspects of emotion

लक्ष विचलित करणाऱ्या भावनिक ऊर्मी काबूत ठेवता येणं, प्रयत्नांचं फळ मिळेपर्यंत संयम, सबुरी ठेवता येणं ही सारी भावनिक कौशल्यं यशप्राप्तीसाठी आवश्ययक ठरतात. आपण काहीतरी वेगळं, मोलाचं करू शकतो, काही निर्माण करू शकतो ही जाणीव कुठल्याही नवनिर्मितीसाठी गरजेची असते. तीच तुमची प्रेरणा ठरू शकते. इतरांच्या भावना ओळखणे. कुठल्याही यशात इतर अनेकांचा सहभाग असतो. स्वतःबरोबरच इतरांच्या भावना ओळखता येणं, त्या भावनांची कदर करता येणं, इतरांच्या नेमक्या् गरजा काय आहेत,

त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित योगदान मिळण्यामध्ये अडचणी काय आहेत हे सारं समजून घेणं हे आवश्ययक असतं. अशा समजूतदारपणातूच इतरांचं मनःपूर्वक सहकार्य मिळवता येतं. ही सिम्पथी म्हणजे सहानुभूती नसते, तर एम्पथी म्हणजे समानुभूती किंवा परभाव अनुभूती असते. व्यवस्थापन, विक्रयकला, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षकी पेशा अशा साऱ्याच कार्यक्षेत्रांत एम्पथीचं कौशल्य कामी येतं.
नातेसंबंध हाताळणे. समूहात काम करताना परस्परसंबंध हे कमीत कमी तणावाचे, सुरळीत ठेवावे लागतात.

त्यासाठी इतरांच्या भावनांचेही नियंत्रण नाही, तरी नियमन करावं लागतं. परस्पर संबंध हे विधायक, उत्पादक राहतील, परस्परपूरक व परस्पर प्रेरक राहतील, याची दक्षता घ्यावी लागते. ज्यांना हे जमतं तेच नेतृत्व करू शकतात. मग ते एखाद्या छोट्या गटाचं असो की संपूर्ण देशाचं! हे सारे पैलू यशप्राप्तीसाठी मोलाचे ठरतात. शालेय वयापासूनच हे भावप्रज्ञेचे पैलू आपल्या पाल्यात तसेच स्वतःमध्ये कसे विकसित करता येतील याचा विचार करायला हवा.

Develop aspects of emotion

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात