वृत्तसंस्था
मुंबई – बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबाँम्बमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राजीनामा द्यावे लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांना 14 एप्रिल रोजी चौकशीला बोलावले आहे. देशमुखांचे दोन पीए कुंदन आणि पलांडे यांच्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयच्या टीमने बोलावले आहे. anil deshmukh summond by CBI in connection with 100 cr extortion case
परमवीर सिंग यांनी देशमुखांवर मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि पबचालकांकडून 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी हायकोर्टाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने पोलीस अधिकारी वकील जयश्री पाटील, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची चौकशी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर लागला आहे. अनिल देशमुख यांना १४ एप्रिल रोजी चौकशीला बोलावण्यात आले आहे.
परमवीर सिंग यांचे स्टेटमेंट सीबीआयने साक्षीदार म्हणून नोंदविले आहे. त्याचबरोबर नुकतेच एनआयएच्या अटकेत आलेले पोलीस अधिकारी रियाज काझी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेत. या पार्श्वभूमीवर देशमुखांची चौकशी होते आहे.
अनिल देशमुख यांचे हे दोन्ही पीए मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील आणि एपीआय सचिन वाझे या तिघांना वारंवार भेटायचे. एवढेच नाही तर बार, हुक्का पार्लर सारख्या आस्थपनांकडून पैसे गोळ्या करण्या संदर्भात या दोन्ही सचिवांनी या तिन्ही पोलिसांशी अनेकदा चर्चा केली. त्यामुळे त्यांचे स्टेटमेंट सीबीआयने नोंदवून घेतले आहे. त्यांना अटक होते की नाही हे नंतर ठरणार आहे.
वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App