घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या

वृत्तसंस्था

पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून  पोलिसांना गुंगारा देणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली. विष्णू विटकर (वय 45, रा. हडपसर), असे आरोपीचे नाव आहे.For 28 years on a burglary charge Fugitive accused handcuffed in Pune

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने त्याला अटक केली.त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  त्याने 1992 मध्ये कोथरुड ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली होती.गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक हद्दीत गस्त घालत होते.त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी असलेला आरोपी हडपसर गाडीतळ येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार महेश निंबाळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विष्णू विटकरला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, संतोष क्षिरसागर, सुजित पवार, विल्सन डिसोझा, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, महेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.

For 28 years on a burglary charge Fugitive accused handcuffed in Pune