पुण्यात तूर्तास लॉकडाऊन लावणार नाही पण 2 एप्रिलपर्यंत परिस्थती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 30 एप्रिलपर्यंत शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. No lock down in Pune, school college will re main close upto 30 April
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात तूर्तास लॉकडाऊन लावणार नाही पण 2 एप्रिलपर्यंत परिस्थती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 30 एप्रिलपर्यंत शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी साथ रोखायची असेल तर लोकडाऊन करणे गरजेचे आहे असे वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनास वाटत आहे. मात्र 1 एप्रिल पर्यन्त थांबण्याचा निर्णय सर्वानी एकमताने घेतला आहे. त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावण्यात येतील असे पवार यांनी सांगितले
सर्व राजकीय कार्यक्रम बंद आणि रात्रीचे निर्बंध कायम राहणार आहेत. बागा फक्त सकाळीच चालू राहतील, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, लॉन किंवा मंगल कार्यालयात 50 जणांच्या उपस्थितीतच विवाह समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत.