कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचा सवाल


वृत्तसंस्था

मुंबई – कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय… पश्चिम बंगालसह निवडणूका असलेल्या ५ राज्यांमध्ये का वाढत नाही, याचा अभ्यास करायला आम्ही कोविड १९ टास्क फोर्सला सांगितले आहे, असा अजब युक्तिवाद महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारमधील काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. COVID19 Task Force to study why cases are increasing only in Maharashtra

बंगालमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी जाऊन जाहीर सभा घेताहेत. इकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोविड १९ टास्क फोर्सशी चर्चा करून लॉकडाऊनचे नियोजन करीत आहेत. आणि त्यांचे मंत्री अस्लम शेख नसती खुसपटे काढताना दिसत आहेत, हेच त्यांच्या विधानातून स्पष्ट होते आहे.



पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये निवडणूका आहेत. तिथे मोठ मोठे नेते, मंत्री प्रचारात गुंतले होते आणि आहेत. त्यांच्या मोठ्या जाहीर सभा झाल्या आहेत आणि होत आहेत. त्या राज्यांमध्ये कोविड १९ चा फैलाव का वाढत नाही… याचा अभ्यास कोविड टास्क फोर्सने केला पाहिजे, अशी सूचना अस्लम शेख यांनी केली आहे.

इतर मंत्री आणि मोठ्या नेत्यांच्या सभांकडे बोट दाखविताना अस्लम शेख हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या झालेल्या आणि होणाऱ्या प्रचार सभा विसरले. त्यावर त्यांनी काहीही कमेंट केली नाही.

COVID19 Task Force to study why cases are increasing only in Maharashtra

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात