पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर लादणाऱ्या राजस्थान सरकारविरोधात पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन, एक दिवस राज्यातील सर्व पेट्रोलपंप बंद

पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट आकारून राजस्थान सरकारकडून होत असलेल्या वसुलीच्या विरोधात राज्यातील सर्व पेट्रोलपंपचालकांनी बंद पाळला. सुमारे सात हजार पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. व्हॅट कमी केला नाही तर २५ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने दिला आहे. Petrol pump operators protest against Rajasthan government imposing highest tax on petrol and diesel


विशेष प्रतिनिधी

जयपूर : पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट आकारून राजस्थान सरकारकडून होत असलेल्या वसुलीच्या विरोधात राज्यातील सर्व पेट्रोलपंपचालकांनी बंद पाळला. सुमारे सात हजार पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. व्हॅट कमी केला नाही तर २५ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने दिला आहे.

राजस्थानात पेट्रोलवर ३६ टक्के तर डिझेलवर २६ टक्के व्हॅट आकारला जातो. देशात सर्वाधिक व्हॅट येथेच आहे. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा बोजा पडत आहे. राजस्थानातील काही शहरांमध्ये मधल्या काळात पेट्रोलचा भाव शंभर रुपयांपेक्षा जास्त झाला होता. संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली होती. मात्र, त्याचे मुख्य कारण हे राज्य सरकारकडून आकारला जाणारा कर हेच होते.राजस्थानच्या शेजारील मध्य प्रदेशात पेट्रोलवर ३३ टक्के तर डिझेलवर २३ टक्केच व्हॅट आहे, तर गुजरातमध्ये तर पेट्रोलवर २१ टक्के आणि डिझेलवर २० टक्के व्हॅट आहे. त्यामुळे येथील पेट्रोलपंप चालकांनी राज्य सरकारकडे व्हॅट कमी करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे राजस्थान सरकार मागणी मान्य करत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांनी एक दिवसासाठी बंद पाळला. व्हॅट कमी केला नाही तर २५ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

एक दिवसाच्या बंदमुळे नागरिकांचे हाल झाले. राजस्थानात दररोज तीन कोटी लिटर पेट्रोल, डिझेलची विक्री होते. त्यामुळे राज्य सरकारला रोड सेसमधून मिळालेल्या ३४ कोटी रुपयांचा करही मिळू शकला नाही.

Petrol pump operators protest against Rajasthan government imposing highest tax on petrol and diesel