मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संभाजीनगरची एक मे महाराष्ट्र दिनाची जाहीर सभा “हिट” होईल याची सरकारला खात्री आहे, पण शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मात्र ही सभा कशी होईल??, त्याची वेगळीच “चिंता” लागून राहिली आहे…!! Raj Thackeray: Sambhajinagar meeting, request of police and according to Chandrakant Khaire, hired men !!
राज ठाकरे यांनी सध्या मशिदींच्या भोंग्या विरुद्ध आवाज उठवल्यामुळे महाराष्ट्रात विशेषत: संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण होईल, अशी भीती पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी मनसेला दोन सूचना केल्या आहेत. संभाजीनगरची जाहीर सभा राज ठाकरे यांनी 1 मे ऐवजी बकरी ईद नंतर म्हणजे 3 मे नंतर घ्यावी आणि जाहीर सभेचे ठिकाण मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाऐवजी गरवारे स्टेडियम करावे, अशा या सूचना आहेत. याचाच वेगळ्या भाषेत अर्थ महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारला राज ठाकरेंची सभा “हिट” होईल. त्याचा काही परिणाम होईल, अशी खात्री वाटते आहे… पण शिवसेनेचे मराठवाड्यातले नेते संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे मात्र राज ठाकरेंच्या सभेबाबत वेगळ्या प्रकारे “निश्चिंत” आहेत…!! राज ठाकरे यांना संभाजीनगर मध्ये प्रतिसाद काही मिळणार नाही. त्यांच्या सभेला भाड्याने माणसे आणावे लागतील. पैसे देऊन देखील सभेला गर्दी जमणार नाही, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
शिवसेनेचे 4 टर्म खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे इतके खात्रीपूर्वक बोलत असतील, तर राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेला जिथे आहे तिथे, म्हणजे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आणि जेव्हा जाहीर केली आहे तेव्हाच म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनी परवानगी द्यायला काय हरकत आहे…??
राज ठाकरे यांच्या सभेला जर पैसे देऊनच माणसे आणावी लागणार असतील, तर मनसे सारखा “अदखलपात्र” पक्ष पैसे देऊन देऊन तरी किती देणार…?? आणि माणसे आणून आणून तरी किती आणणार…?? जर मनसे आणि राज ठाकरे हे शरद पवारांच्या दृष्टीने “अदखलपात्र” आणि चंद्रकांत खैरे यांच्या दृष्टीने पैसे देऊन सभेला माणसे असणारा पक्ष असेल, महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांना सभेचे ठिकाण आणि तारीख बदलायला सांगायचे कारण काय…?? होऊन जाऊ दे ना, त्यांची संभाजीनगरची सभा…!! जी काही व्हायची ती राज ठाकरे यांची “फजिती” होईल ना… त्यातून ना आवाज निघेल, ना धूर…!! मग एवढे घाबरायचं कशाला…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App