युक्रेनच्या मारियुपोल शहरावर रशियाचा ताबा; ५६ दिवसानंतर पहिला मोठा विजय प्राप्त


वृत्तसंस्था

कीव्ह/मॉस्को : युक्रेनच्या मारियुपोल शहरावर रशियाने ताबा मिळविल्याची घोषणा केली आहे. युध्दाच्या ५६ दिवसानंतर रशियाला हा पहिला मोठा विजय प्राप्त झाला आहे.Russian occupation of the Ukrainian city of Mariupol; First big victory after 56 days

रशिया-युक्रेन युद्धाला ५६ दिवस लोटल्यानंतर रशियन लष्कराने युक्रेनच्या मारियुपोल शहरावर ताबा मिळवला आहे.रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतः ही घोषणा केली. ते म्हणाले, आम्ही शहराला मुक्त केले. केवळ अजोव्हस्टल प्रकल्प वगळता संपूर्ण मारियुपोल शहरावर रशियन लष्कराने ताबा मिळवल्याचे स्पष्ट केले. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने मारियुपोलला जवळपास 90 टक्के उद्धवस्त केले आहे.दुसरीकडे, रशियन सैन्याने हल्ले वेगवान केलेत. बुधवारी एकाच दिवशी युक्रेनवर ११००० हल्ले करण्यात आले. ब्लादिमीर पुतीन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनबासमध्ये २० हजार भाडोत्री सैनिक तैनात केलेत. रशियाने आपल्या व्हॅगनर ग्रुप या अघोषित तुकडीच्या माध्यमातून सीरिया, लीबिया व जॉर्जियातील हे भाडोत्री सैनिक आणले आहेत.

Russian occupation of the Ukrainian city of Mariupol; First big victory after 56 days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती