अमाेल मिटकरींच्या वक्तव्यावरुन पुण्यात वाद; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमाेर ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते भिडले


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमाेल मिटकर यांनी कन्यादानावरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद गुरुवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर दिसून आले.


विशेष प्रतिनिधी

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमाेल मिटकर यांनी कन्यादानावरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद गुरुवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर दिसून आले. मिटकरी यांचे वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते जमले असताना, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यर्त्यांनी जाेरदार विराेध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.National Congress party members and brahman mahasangh members clashesh in pune

ब्राम्हण महासंघाच्या वतीने शनिवारी अमाेल मिटकरी यांच्या बेलगाम वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुरुजींच्या पारंपारिक वेषात व पारंपारिक मंत्रीघाेष करण्यात येणार हाेते. परंतु त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माेठया सं‌ख्येने जमले आणि त्यांनी केळी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांना भेट देण्याचा प्रयत्न करत घाेषणाबाजी केली. याप्रकारामुळे धक्काबुक्की झाल्याने पाेलीसांना परिस्थिती नियंत्रणात आणताना कसरत करावी लागली.

याबाबत दवे म्हणाले, अमाेल मिटकरी यांना काेणताही वैचारिक अधिष्ठान नाही. आमदार मिटकरी यांनी काेणतीही माहिती नसताना चुकीचे मंत्र सांगत समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी पत्नी मी पुराेहिताला देताे अशाप्रकारचे वक्तव्य असलेला काेणताही मंत्र काेणताही पुराेहित उच्चारत नाही.तरीसुध्दा खाेटे बाेलण्याचा प्रयत्न मिटकरी यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया बाहेर काही मंडळी येऊन आंदोलन करत हाेती. आंदोलन कर्त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा बुक आणून ठेवण्यात आला हाेता. या कार्यालयाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न साेडवण्यासाठी झाला पाहिजे. ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्त्यांनी मंत्राेच्चार करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे निषेधात वक्तव्य केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. अमाेल मिटकरींचे भाषण हे त्यांचा एक वेळचा विनाेद हाेताे. राज्यात विनाेदबुध्दी राहिली नसून तेवढयापूरताच ताे मर्यादित हाेता.

National Congress party members and brahman mahasangh members clashesh in pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात